राहाता:- वाकड़ी श्रीरामपुर रोडवर हॉटेल न्यू यश पॅलेस लगत पहाटे 3 च्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कांदा रोप घेऊन श्रीरामपुर कड़े जाणाऱ्या पिक अप् व्हॅनने शिरडीकडे जाणाऱ्या दुचाकी स्वारांना उडविले. दुचाकी वरील दोघांचा जागेवर मृत्यु झाला. दोघेही साई संस्थानचे कर्मचारी होते. वारे व ताम्हाने असे दोघाचे नाव आहे. घटनेनंतर पिक अप् मधील दोघे श्रीरामपुर च्या दिशेने फरार झाले असून, जखमींना साई सुपर हॉस्पिटल मधे मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास पोलिस करीत आहेत. (अमोल राजे शिरसाठ, नगर जिल्हा “युवा सह्याद्री” पत्रकार)]]>
Related Posts
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचे आयोजन
जळगाव:(बबनराव वि.आराख) शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर हे वेगवेगळे उपक्रम सतत राबवणारे महाराष्ट्रातील एकमेव फाउंडेशन आहे. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला,…
