पैठण:- तालुक्यातील थापटी गावाजवळ झालेल्या जबर दुर्घटनेत भरधाव येणाऱ्या मोटार सायकलची चार चाकी मोटारीला धडक लागून भिषण अपघात घडला. औरंगाबादहून बीडकडे जाणाऱ्या ट्रक एम.एच.०४-जी.वाय. ०२२१ ची मोटर सायकल एम.एच. २०-सी.ई. ६२८२ ला धडक लागून दुचाकीस्वारास चिरडले. या गंभीर दुर्घटनेमध्ये दुचाकीस्वार चार चाकीखाली सापडल्याने गाडीने पेट घेतला व मोटार सायकल स्वार गंभीर जळून खाक झाले. या भिषण अपघातामध्ये मिथुन विष्णू राठोड हे मृत पावले असून, अभिषेक अनिल राठोड हे जखमी आहेत. त्यांच्या सह बबलू सुदाम राठोड यांना घाटी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या भिषण अपघातामुळे भयभीत होऊन ड्रायव्हर फरार झाला आहे. (अमोल शिरसाठ :- ‘युवा सह्याद्री’ प्रतिनिधी, नगर)]]>
Related Posts
डॉ. शिवचरण उज्जैनकर क्रांतीसुर्य शिक्षक प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
नाशिक (बबनराव आराख) : नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी तालुका मुक्ताईनगर येथील उपक्रमशील ज्येष्ठ शिक्षक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षडॉ.शिवचरण…
