BREAKING NEWS
GMT+2 11:07

संपादकीय

“युवा सह्याद्री महाराष्ट्राला अर्पण” महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेला साप्ताहिक युवा सह्याद्री वृत्तपत्राच्या वतीने सप्रेम सविनय जय महाराष्ट्र !!!   arun-maliतसे पाहता साप्ताहिक युवा सह्याद्री वृत्तपत्राची सुरूवात १ नोव्हेंबर २००८ रोजी करण्यात आली. एकूणच महाराष्ट्रातील राजकिय, सामाजिक आणि गुन्हेकारी परिस्थिती पाहता, मराठी माणसांवर होणारे अन्याय, शेतकरी बांधवांच्या होणार्या आत्महत्या, महिलांवरिल होणारे अत्याचार, वाढती बेरोजगारी, राजकिय वरदहस्ताने होणारे असंख्य महा घोटाळे…..हे सर्व पाहात असतांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण देखील ज्या समाजामध्ये राहतो, वावरतो त्या आपल्या समाजासाठी काही तरी केलेच पाहिजे, याच ऊदात्त हेतूने प्रेरीत होऊन “युवा सह्याद्री” वृत्तपत्राची सुरुवात केली…. आज तमाम महाराष्ट्रीय मराठी जनतेला अभिमानाने सांगावेसे वाटते कि, “युवा सह्याद्री” हे आपले वृत्तपत्र आम्ही आपल्या सेवेसाठी “ऑनलाइन” रुपात आणले आहे…..आणि हे सर्व सहज शक्य झाले, ते आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने, आमच्या बरोबर गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थी भावनेने आपली सेवा समजून आम्हाला सहकार्य करणार्या आमच्या सहकारी बांधवांमुळे, तसेच आमच्या हितचिंतकांमुळेच. त्यामुळे आम्ही खरोखरच सर्वांचे आभारी आहोत. आम्ही तमाम मराठी जनतेला “युवा सह्याद्री” वृत्तपत्राच्या वतीने असे आवाहन करतो कि, आपल्यावर जर अन्याय होत असेल, आपल्या विभागातील काही सरकारी कामे होत नसतील तर, ऊचला लेखणी अन्याया विरोधात आणि आपल्या समस्या आमच्या yuvasahyadri@gmail.com वर मेल करा, आम्ही आपल्याला न्याय देण्याचा नक्किच प्रयत्न करू. नव्हे, ते आमचे कर्तव्यच आहे. आम्ही आपल्या “युवा सह्याद्री” वृत्तपत्राच्या वतीने जाहिर आवाहन करतो कि, जागरूक तथा सामाजिक बांधिलकी जोपासण्यास इच्छुक असणार्या व्यक्तिंनी “पत्रकार” होऊन आम्ही हाती घेतलेल्या या सामाजिक कार्याला हात-भार लावावा.. जय हिन्द, जय महाराष्ट्र ! वंदे मातरम्, !!! संपादक, अरुण आत्माराम माळी ९८२१००४९६९/९२२०४७४७८९]]>

2024 Copyright Yuva Sahyadri | All Rights Reserved