दुष्काळी सांगोला भागातील पाणीप्रश्न पेटला. बारामतीचे जास्तीचे पाणी घेऊ देणार नसल्याचे श्रीकांतदादा देशमुख यांनी सांगितले़. अनेक कार्यकर्ते भर चौकात गळफास घेणार असल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ.
सांगोला, सोलापूर (श्रीकृष्ण देशपांडे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज शुक्रवारी मुंबई येथे बैठक होणार आहे. पवार यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीकडे वळविले आहे. आज होणाऱ्या मुंबई येथील बैठकीत बारामतीचे पाणी जैसे थे राहावे, असा निर्णय झाल्यास सांगोला तालुक्यातील भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, मा.नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे शहर अध्यक्ष आनंद फाटे यांच्यासह असंख्य शेतकरी, कार्यकर्ते शिवाजी चौक सांगोला येथे गळफास घेणार.
बारामतीचे जास्तीचे पाणी घेऊ देणार नसल्याचे श्रीकांतदादा देशमुख यांनी सांगितले. जर बैठकीत निर्णय सांगोलकरांच्या विरोधात गेल्यास अनेक कार्यकर्ते भर चौकात गळफास घेणार असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या वेळी मा.श्रीकांतदादा देशमुख मा.नवनाथभाऊ पवार , आनंद फाटे, बिरा मेटकरी,वसंत सुपेकर यांना अटक होऊन जामिनावर सुटका करण्यात आली.