ज्ञानोबा- तुकोबा पालखी सोहळ्यासाठी माळशिरस तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज

माळशिरस, (श्रीकृष्ण देशपांडे, सोलापूर):- श्रीसंत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शनिवार  दि .६ जूलै रोजी धर्मपुरी बंगला येथे तालुक्यात प्रवेश करीत आहे तर श्रीसंत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवार दि ७ रोजी सराटी येथे तालुक्यात प्रवेश करीत असून दोन्ही पालखी सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती प्रांताधिकारी शमा पवार यांनी दिली .

*दोन्ही पालखीच्या स्वागतासाठी मान्यवरांची उपस्थिती*
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख ,सहकार मंत्री सुभाष देशमुख ,आ .रामहरी रूपनवर ,जिल्हाधिकारी राजेश भोसले ,जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड ,जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील,प्रांताधिकारी शमा पवार   जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे ,पंचायत समितीच्या सभापती वैष्णविदेवी मोहिते पाटील ,उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण ,तहसीलदार अभिजित पाटील ,यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकारी ,तालुक्यातील मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत .
श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी माजी खा .विजयसिंह मोहिते पाटील ,अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील ,जि .प. सदस्या स्वरुपाराणी मोहिते पाटील ,शितलदेवी मोहिते पाटील यांच्यासह मान्यवर स्वागत करणार आहेत .
*आरोग्य विभाग सज्ज …..तालुका वैद्यकीय अधिकारी –  रामचंद्र मोहिते*
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावर नातेपुते माळशिरस व वेळापूर हे तीन मुक्काम असून या पालखी मार्गावर आरोग्य विभागामार्फत १८ औषध उपचार केंद्रे , ९ रुग्णवाहिका, पाच १०८ रुग्णवाहिका तैनात असणार आहेत .संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर अकलुज व बोरगांव हे दोन मुक्काम असून १६ औषध उपचार केंद्रे , ७ रुग्णवाहिका,पाच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका कार्यरत असणार आहेत. आरोग्य विभागा मार्फत पालखी मार्गावर प्रतिबंधात्मक उपाय योजना मध्ये ७७८ पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ४५ ठिकाणी टँकर भरणा केंद्र असणार आहेत
*२४ तास अखंडित वीज पुरवठ्यासाठी यंत्रणेची तयारी*
सोहळा काळात २४ तास अखंडित वीज पुरवठा राहावा यासाठी वीज वितरण कंपनीच्या सर्व शाखांनी आपआपल्या भागातील कामे पूर्ण केली आहेत .पालखी मार्गावरील रोहीत्राचे बॉक्स दुरुस्ती ,वीज तारावर येणारी झाडे झुडपे तोडण्यात आली आहेत. पाण्याचे टकर भरण्याच्या ठिकाणीही वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी सर्व दुरुस्ती करण्यात आली आहे .तसेच मुक्कामाच्या ठिकाणच्या रोहीत्राजवळ कर्मचार्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत .
*वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी मार्गात बदल*
दि ५ रोजी सकाळी ७ पासून पुणे कडे जाणारी वाहने नातेपुते शिंगणापूर मार्गे वळविण्यात येणार आहेत .दि ६ रोजी पुणे कडे जाणारी वहाणे म्हसवड मार्गे वळविण्यात येणार आहेत .अकलूज वरून येणारी वहाणे मेडद मार्गे  वळविण्यात येणार आहेत .पालखी माळशिरसला मुक्कामी आलेनंतर पंढरपूर कडून येणारी वाहने वेळापूर मधून सालमुख कडे वळविण्यात येअणार आहे .वेळापूर मुक्काम दिवशी गाडेगाव फाट्यावरून वळविण्यात येणार आहेत .
*पाण्याचे ५० टकर उपलब्ध*
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी २७ तर श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी २३ टकर जिल्हा प्रशासनाकडून उपलब्द्ध करण्यात  आले आहेत .
*१६०० मोबाईल टोयलेट*
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी ८५० तर विसाव्याच्या ठिकाणी ५० मोबाईल टोयलेट तर श्री संत तुकाराम महाराजांच्या मुक्कामाच्या ठीकाणी ६५० तर विसाव्याच्या ठिकाणी ५० मोबाईल टोयलेट उपलब्द्ध करण्यात येणार आहेत .
*दोन्ही पालखी सोहळ्यासाठी १० हजार सिलेंडर उपलब्द्ध*
दोन्ही पालखी सोहळ्यातील दिंडीकरयासाठी व व्यवसायिकाकरिता १० हजार सिलेंडर उपलब्द्ध करण्यात आले आहेत .सदरच्या वितरणासाठी तालुक्यातील गस वितरकांना जागा नेमून दिल्या आहेत त्यापुढील प्रमाणे धर्मपुरी विश्रांती स्थळाजवळ ,नातेपुते पिरळे रोड लगत,ग्रामपंचायत नाका,कवितके दवाखना ,पेट्रोल पंप ,मेन रोड पालखी मैदा न ,सदाशिवनगर पेट्रोल पंप ,माळशिरस मारुती मंदिर ,पालखी मैदान ,गोपाळराव देव प्रशाला ,न्यू इंग्लिश स्कूल ,खुडूस बस स्थानकानजीक,पिसेवाडी सुत गिरणी वेळापूर पालखी मुक्काम ठिकाण जवळ दोन ठिकाणी ,पेट्रोल पंपनजीक ,बस स्थानक ,बोंडले बस स्थानकया ठिकाणी सिलेंडर वाटप करण्यात येणार आहे .
*माळशिरस तालुक्यात चार रिंगण सोहळे*
पालखी सोहळ्या मध्ये सर्वाधिक रिंगण सोहळे हे माळशिरस तालुक्यात होतात .श्री संत ज्ञानेश्वर सोहळ्यात दोन व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दोन असे चार रिंगण तालुक्यात होतात .श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण सोहळा रविवार दि ७ जूलै रोजी पुरुंदावडे तेथे तर दुसरा रिंगण सोहळा पानीवपाटी खुडूस सोमवार दि ८ रोजी येथे होणार आहे .तर श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण रविवार दि ७ जूलै अकलूज येथे तर दुसरे उभे रिंगण माळीनगर  दि .८ येथे होणार आहे .

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *