जळगाव – कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या हातात लाठ्याकाठ्या दिसून येतात. मात्र आता तंत्रज्ञान पुढे गेले आहे. येत्या काही दिवसात पोलिसांच्या हातात आधुनिक शस्त्र दिसून येतील, त्यादृष्टीने सरकार पातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. पोलीस दलाच्या सायबर लॅबचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण पाहता त्याच जिल्ह्यात हे गुन्हे उघडकीस यावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राज्यात १५ ऑगस्टपासून प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब सुरू करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांपर्यंत तत्काळ पोहोचणे पोलिसांना शक्य होणार आहे. तंत्रज्ञानाने जितकी प्रगती केली, तितके त्याचे तोटेही असल्याचे फुंडकर म्हणाले. या लॅबमुळे पोलीस दल आणखी सक्षम झाले आहे. लाडकी या अनुबोधपटाचे राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते अनावरण झाले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या प्रारंभी फुंडकर आणि मान्यवरांच्या उपस्थित हस्ते चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर अनुबोधपटाचा काही भाग सभागृहात दाखविण्यात आला. निर्माते मिलिंद पाटील यांचा सत्कार फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. आगामी वर्षात हा चित्रपट गावागावांतून प्रदर्शित करून जनजागृती करण्यात येणार आहे. शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयानजीक ‘नभांगण’ या इमारतीत १५ ऑगस्टपासून सायबर लॅब कार्यान्वित झाली आहे. त्याचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए.टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार गुरुमुख जगवाणी, आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार किशोर पाटील, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सागर कुळकर्णी युवा सह्याद्री प्रतिनिधी]]>
Related Posts
डॉ. शिवचरण उज्जैनकर क्रांतीसुर्य शिक्षक प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
नाशिक (बबनराव आराख) : नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी तालुका मुक्ताईनगर येथील उपक्रमशील ज्येष्ठ शिक्षक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षडॉ.शिवचरण…
नवसाला पावणारी भगूरची रेणुका माता
भगूरचे श्री रेणुका माता मंदिर एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे, ज्याची स्थापना भृगु ऋषींनी केली असल्याचे मानले जाते. या…
