जळगाव (बोदवड): तालुक्यातील जलचक्र बु. येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी रामराव पाटील यांच्या पत्नी श्रीमती सविता पाटील तसेच मुक्तळ येथील शेतकरी शिवदास पाटील यांच्या पत्नी सुशिला पाटील यांना एक लाख रुपये मदतीचा धनादेश ना. लोणीकर यांच्या हस्ते बोदवड येथील शासकीय विश्रागृह येथे वितरीत करण्यात आले. यावेळी खासदार रक्षाताई खडसे, माजीमंत्री तथा आमदार एकनाथ खडसे, तहसीलदार श्री. थोरात हे उपस्थित होते.]]>