पंढरपूर, दि. 4 – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड तालुक्यातील बाळसमुद्र या छोट्याशा गावातील मेरत कुटुंबाला यंदाच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. परसराव उत्तमराव मेरत ( वय ४२) व त्यांच्या सुविद्य पत्नी अनुसया (वय ४२) अशी या भाग्यवंत दांपत्य वारकऱ्यांची नाव आहेत. व्यवसायाने शेतकरी असलेले गरीब घरातील मेरत दाम्पत्य गेल्या दहा वर्षापासून ते वारी करतात तर गेल्या तीन वर्षापासून ते वारीत माऊलींच्या पालखीसह पायी सहभागी होत आहेत. त्यांची ३ एकर जिरायत शेती असून, दोन मुली व दोन मुली आहेत. मुलींची लग्ने झाली आहेत. एक मुलगा शेती करतो तर एक शिकत आहे. आमचे पूर्व जन्माचे कांही भाग्य असेल म्हणून हा मोठा मान आम्हाला मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.]]>
Related Posts
मुख्याध्यापक श्री.शरद उद्धवराव जंगाले सरांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ !
शिक्षक असण्याची पहिली अट ‘विद्यार्थी’ असणे हीच आहे – विलासराव देशमुख अक्कलकोट (रवींद्र मालुसरे) : माणसांचं मोठेपण तो किती मोठा…
