(सतिश सं.धामळे प्रतिनिधी) दूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी या गावात दरवर्षी परंपरागत नवरात्रि उत्सव साजरा केला जातो. तसेच या वर्षी देखील नवरात्रोत्सव साजरा होणार आहे . तसेच राज्यात सूरू झालेल्या विद्यूत भारनियमनामुळे गावातील असंख्य भाविक भक्तांच्या आस्थेला व श्रद्धेला सार्वजनिक मंडळामध्ये होत असलेल्या पंचरंगी, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक , कार्यक्रमाला मोठा त्रास होणार आहे. गावात शांतता एकोपा नांदावा तसेच या काळात होणारे विद्युत भारनियमन दहा दिवस दूर्गोत्सवच्या काळात बंद करण्यात यावे असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे शाखा अध्यक्ष प्रशांत सातपुते यांनी कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरन यांना देण्यात आले. जर भारनियमन बंद केले नाही तर सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते तालाठोक आंदोलन करण्यात येणार आहे, असा ईशारा ब्राह्मणवाडा थडी चे अध्यक्ष प्रशांत सातपुते यांनी दिला. निवेदन देताना आनंद उल्हे ,सतिश आगरकर, अक्षय औतकर, सौरभ दारोकर, अक्षय शिरभाते , शूभम कडू, उपस्थित होते.