पुणे: कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही आपला दबदबा कायम ठेवण्याच्या व नव्या जबाबदारीसह नवखा कर्णधार विराट कोहली आपली सेना घेऊन सज्ज झाला आहे. धोनीच्या एकदिवसीय व टी २० कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीवर संघाची धुरा देण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीची सुरुवात आज येथे गहुंजे येथील स्टेडीयमवर होत असून भारत आपल्या घराच्या मैदानावर आपला फॉर्म कायम राखण्याच्या इराद्याने उतरेल. भारताने पाहुण्या इंग्लंड संघाला ५ सामन्याच्या कसोटी मालिकेत ४-० ने पराभूत करीत आपले वर्चस्व दाखविले तर या पराभवाची परतफेड करण्यास इंग्लंड चं संघही सज्ज झाला आहे. भारताच्या चांगल्या फॉर्मचा विचार केला तर दुसरीकडे इंग्लंडचा एकदिवसीय संघही कसोटी संघापासून वेगळा असून त्यांच्या या संघात नवखे व चांगल्या फॉर्मात असलेले खेळाडू आहेत. मधल्या फळीतील जॉनी बरीस्तो, जोस बटलर व बेन स्टोक्स यांचा जबरदस्त फॉर्म, तर जो रूट व कर्णधार इयान मॉर्गन यांची आक्रमक फलंदाजी भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी ठरू शकते. http://gty.im/631651336 भारतीय संघात युवराज सिंघ याचे पुनरागमन भारतीय चमूत मजबुती आणण्यासाठी तयार आहे तर कर्णधार कोहली, धोनी यांच्यासह के. एल. राहुल, शिखर धवन, अजिंक्य रहाणे हेही आपली शैली दाखविण्यास सज्ज असतील. मागील वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान जखमी झालेल्या विराट युवराज सिंघने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही तर २०१३ नंतर त्याचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. नव्या कर्णधारासह व नव्या खेळाडूंच्या उपस्थित भारतीय संघाला आपला एकदिवसीय क्रिकेट मधला फॉर्म कायम ठेवण्याचं मोठ आव्हान असेल तर इंग्लंड संघाला कसोटी मालिकेतील दारूण पराभव विसरून नव्या जोमाने संघाची बांधणी करण्याचा दबाव असेल.]]>
Related Posts

सनरायझर्स हैद्राबाद व हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन यांच्यात तिकिटांवरून वाद?
आयपीएलच्या मोफत पासवरून एचसीए व एसआएच यांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे. तर यामध्ये आता आयपीएल बॉडी व बीसीसीआय यांनी उडी…