पिंपरी – शाळा सुटल्यानंतर वॉटरबॅगमध्ये उरलेले पाणी विद्यार्थी एका पिंपात जमा करतात. जमा झालेले पाणी शाळेच्या परिसरातील रोपांना घातले जाते. तसेच, त्या पाण्याद्वारे परिसराची स्वच्छताही केली जाते. शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या पाणीबचतीच्या मंत्रामुळे दर वर्षी सुमारे एक लाख लिटर पाण्याची बचत होत आहे. हा स्तुत्य उपक्रम निगडी प्राधिकरणातील सिटीप्राइड शाळेच्या वतीने राबवून इतर शाळांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सिटी प्राइड स्कूल, निगडी प्राधिकरण – शाळेतील विद्यार्थी घरी जाताना वॉटर बॅगांमधील उरलेले पाणी या पिंपामध्ये मध्ये जमा करतात. त्यावर शाळेची साफसफाई करून बागही फुलविली जाते… (संकलन:- श्री. विनायक काळेकर, पुणे)]]>