जळगाव(सागर कुलकर्णी): जळगाव येथे नुकतेच संविधान दिवस व २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या शूर वीरांना योग शिबिराचे आयोजन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जळगाव जिल्हा पतंजली योग प्रचारक कमलेश आर्य (कुळकर्णी) गाव जैतपीर यांनी कळमसरे येथे योग शिबिर घेऊन श्रध्दांजली अर्पण केली. जिल्हा परिषद शाळा व श्रध्दा माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक वृंद, ग्रामीण व विद्यार्थी यांनी हुतात्म्यांना वंदन करून व योगा करून श्रध्दांजली अर्पण केली. यामध्ये सुमारे ३०० नागरिक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. विद्यार्थी व उपस्थित युवकांना देशासाठी बलीदान दिलेल्या हुतात्म्यांचा इतिहास सांगण्यात आला. ‘संविधान दिवस’ काय आहे या विषयी माहिती देण्यात आली. तसेच योगा काय, योगा केल्याचे फायदे, अक्युप्रेशरचे फायदे, अन्य आजार विषयी फायदे, तथा स्वदेशी विषयी प्रचार करण्यात आला.]]>
Related Posts
नवसाला पावणारी भगूरची रेणुका माता
भगूरचे श्री रेणुका माता मंदिर एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे, ज्याची स्थापना भृगु ऋषींनी केली असल्याचे मानले जाते. या…