अमळनेर (सागर कुळकर्णी): ‘अमळनेर’ ही संत सखाराम महाराजांची वाडी व श्री मंगळ देव ग्रह मंदिर येथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार कार्यावरील ‘विश्वविधाता’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींवरील मराठीतील हा पहिलाच चित्रपट आहे. साधारणतः डिसेंबर मध्ये चित्रपट प्रदर्शित होईल.नंतर अन्य भाषांमध्येही हा चित्रपट अनुवादीत केला जाणार आहे. कैलास पवार या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व निर्माते आहेत. मोहन जोशी, अनंत जोग, भाऊ कदम, सचीन पिळगावकर, वर्षा उसगावकर आदी दिग्गज कलावंत या चित्रपटात आहेत . ऋषिकेश मोरे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या प्रमुख भूमिकेत आहेत. मूळ अमळनेर चा रहिवासी असलेला सचिन बिर्हाडे याचीही या चित्रपटात भूमीका असून तो चित्रपटाच्या प्रॉडक्शन टिममध्येही आहे. परमेश्वर महाराज व अर्जुन राठोड हेही या चित्रपटात आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे चरित्र ज्यांनी लिहिले ते शंकरभट्ट श्री मंगळ देव ग्रह मंदिराच्या दर्शनाला येतात असा प्रसंग चित्रित करण्यात आला . या प्रसंगात प्रभारी नगराध्यक्षा सौ. स्वाती पाठक, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, मंदिराचे पुजारी गणेश खरोटे, पुरोहित प्रसाद भंडारी, विवेक नाईक , बाल कलावंत श्रद्धेश गायकवाड यांच्याही भुमिका आहेत.]]>
Related Posts
डॉ. शिवचरण उज्जैनकर क्रांतीसुर्य शिक्षक प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
नाशिक (बबनराव आराख) : नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी तालुका मुक्ताईनगर येथील उपक्रमशील ज्येष्ठ शिक्षक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षडॉ.शिवचरण…
