मुंबई:- धर्मासाठी बलिदान दिलेल्या, प्राणांची आहुती दिलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाल्गुन अमावस्येला वैकुंठास गेले. ते नुसते गेले नाहीत तर धर्माचा अभिमान स्वाभिमान आणि स्वराज्यासाठी लढण्याची ताकत देऊन गेले. पण कुठे गेली हो हि ताकत !!! कुठे गेला आमचा स्वाभिमान, धर्माभिमान? पण काळाच्या ओघात आपण सर्वच विसरत चाललो आहोत. खरंच याच साठी का हो यांनी बलिदान केले? नक्की कसं झालं हे सर्व? का त्या औरंग्याने एवढ्या क्रूरपणे प्राण घेतले महाराजांचे? काळाच्या ओघात आपण नेमकं काय विसरलो आहोत? आपण त्यांची प्रेरणा कशी घ्यावी? देव देश आणि धर्मासाठी बलिदान दिलेल्या महाराजांकडे कोणत्या गोष्टी आजच्या जीवनात शिकण्यासारख्या आहेत? अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर नक्की या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाच्या बैठकीला? तुमचं जीवन, स्वाभिमान आणि अभिमान पूर्ण बनण्यासाठी प्राण वेचलेल्या धर्मवीरांसाठी आपल्या आयुष्यातील एक दिवस त्यांचे पराक्रम ऐकण्यासाठी त्यांचे बलिदान समजून घेण्यासाठी नक्की द्याल अशी आशा आहे. दिनांक – १४ फेब्रुवारी २०१६, रविवार वेळ – सायंकाळी ५ वाजता. स्थळ – इर्ला टेक्निकल महाविद्यालय, इरला तलावा समोर, विलेपार्ले पश्चिम. मुंबई वक्ते- श्री. अनंतराव करमुसे आपण सर्व या बलिदानाचे महत्व समजून घेण्यासाठी वेळेत उपस्थित रहावे. 🙏🏻 श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान-मुंबई संपर्क – विनायकराव बालुगडे ९९२०४२४९९८ राजेशराव सावंत ९९६७५५५०९८ संकेतराव कंक ९८६९५५७७५८ (सतिष पाटील :- युवा सह्याद्री)]]>
Related Posts

दादर धुरु हॉलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रम !
मुंबई प्रतिनिधी: मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, धुरु हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय व मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या…