मुंबई:- राष्ट्राभिमानी समिती, राज्य जन स्वराज्य संस्था आणि ज्ञानदा प्रबोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज माहीम दादर मधील नागरिकांसाठी मतदान ओळख पत्र आणि मतदान ओळखपत्रातील दुरुस्ती त्याकरिता मतदान ओळख पत्र नोंदणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून ह्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. माहीम मधील लेफ्ट. दिलीप गुप्ते मार्गावरील स्थित दुर्गेश नेट सिटी मध्ये मतदान अधिकारी यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या नवीन मतदान ओळख पत्र व दुरुस्थिसाठी फॉर्म भरून घेतले. सदर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते श्री. भरत राऊत, जगजीत सिंग भुई तसेच समितीचे सल्लागार श्री. विलास फडके हे उपस्थित होते. राष्ट्राभिमानी समितीचे व ज्ञानदा प्रबोधनचे अध्यक्ष प्रशांत पळ, वनिता चेटियार, राजेश पवार, शंकर भोमिक, रुपेश शिगवण तसेच राज्य जन स्वराज्यचे अध्यक्ष श्री. प्रदीप शिंदे व प्रियांका पळ यांनी अथक मेहनत घेतली.