कराड, सातारा: गड किल्ले संवर्धन कार्यातील एक दर्दी मावळा शुभम आटवे यांच्या अपघाती निधनाने दुर्ग प्रेमी परिवारात दुःखाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या अशा अपघाती अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
किल्ले वसंतगड वरती शुभमच्या माध्यमातून कृष्णा तलाव लगत असणाऱ्या समाधी शेजारी इतिहासाच्या पाऊल खुणा या ग्रुपच्या साह्याने शुभमने येथे भगवा ध्वज अखंड फडकवत राहावा या उद्देशाने उभा केला. शुभमचे एकच ध्येय होते कि, आपल्या जवळील गड किल्ले आपल्या नजरे देखत चांगले होताना पाहायचे होते. वसंतगड वरील उत्तर बुरुज संवर्धनाच्या बाबत गेल्या आठवड्यात चर्चा देखील झाली होती.
शुभम आटवे (काळोशी) कोरेगांव यांचे कराड येथे अपघाती निधन झाले. संवर्धन कार्यातील एक दर्दी मावळा निघून गेला. हि दुर्ग संवर्धनातील खूप मोठी हानी म्हणता येईल. शुभमची ही वेळ नव्हती आम्हाला सोडून जायची अशी दुखद अंतकरणाने प्रतिक्रिया दुर्गप्रेमी श्री. रामभाऊ माळी यांनी दिली आहे.
ईश्वर शुभमच्या आत्म्यास शांती प्रदान करो हीच त्यांना युवा सह्याद्री परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण..!
जय शिवराय