फकिरा पँथर आयोजित पोतराज व झाडु मोर्चाची यशस्वी सांगता !

नवी मुंबई (विरेंद्र म्हात्रे) : दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी फकिरा पँथर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून नवी मुंबई महानगर पालिकेवर पोतराज व झाडु मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चात असंख्य समाज बांधव आणि भगिनींनी विविध वेषभुषा करत नवी मुंबई महानगर पालिकेवर रोष व्यक्त केला. बहुजन समाजाची अस्मिता साहीत्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीकरिता नवी मुंबई महानगर पालिकेने इतर महानगर पालिकेप्रमाणे जयंती उत्सवा करिता प्रतिवर्ष किमान १० लाख रुपयाची तरतुद करावी.

या अग्रही मागणीच्या पूर्ततेसाठी बहुजन समाज रस्त्यावर उतरला होता. नवी मुंबई महानगर पालिका सामाजिक विकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांच्याकडे जयंतीनिमित्त अर्थिक तरतुद करण्याबाबत सकारात्मक धोरण ठेवून आयुक्त महोदयांसोबत त्वरित बैठक नियोजित करण्याचे लिखित पत्र संघटनेच्या संस्थापक / अध्यक्ष ऍड. गुरु सुर्यवंशी, हाजी शाहनवाझ खान महासचिव – ए आई एम आई एम विद्यार्थी आघाडी व पदाधिकारी यांना सुपूर्द केले. सदर शिष्टमंडळात प्रमोद आवाड, शंकर चांदणे, शेषेराव कुचेकर, अमोल सुर्यवंशी, संतोष पवार, बाळासाहेब राजपंगे, सुरेश मानवतकर, मधुकर साठे, रवी सुर्यवंशी, साहेबराव बाजड, यांचा समावेश होता.

मोर्चा यशस्वी करण्याकरिता फकिरा पँथरचे बाळु कसबे, अमोल गणपत सुर्यवंशी, अण्णाराव लोकरे, तुळशीराम गायकवाड, श्रीपत सुर्यवंशी यानी विशेष मेहनत घेतली.