प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी देखील अखिल भारत हिंदु महासभा पक्षाच्या वतीने आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरी करण्यात आली.
यावेळी अखिल भारत हिंदु महासभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. दत्तात्रेय सणस, प्रदेश कार्यवाह श्री. महेश सावंत, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. गोविंद पवार, रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. मधुकर खामकर, मुंबई हिंदु महासभेचे नेते तथा अधिवक्ता श्री. प्रवीण गर्जे उपस्थित होते.

तसेच मोठ्या प्रमाणावर महिलांची व शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
यावेळी असंख्य वरिष्ठ देशप्रेमी व मोठ्या प्रमाणावर तरुणांनी देखील आवर्जून उपस्थिती दर्शविली.
अखिल भारत हिंदु महासभा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी तसेच ज्येष्ठ देशप्रेमी नागरिक व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमीनी उपस्थित राहून आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले व मान्यवर तसेच ज्येष्ठ महिला व विद्यार्थ्यांनी पुष्पांजली अर्पण केली.
युवा सह्याद्री वृत्तपत्राचे अधिकृत युट्यूब चॅनल करिता आमचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री. गोविंद पवार, ठाणे.
