जखमी प्रतिका रावलच्या जागी उर्वरित स्पर्धेत शेफालीला स्थान मिळाले आहे. भारत गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळेल.
मुंबई: आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने भारतीय संघात प्रतीका रावलच्या जागी शफाली वर्माची निवड मंजूर केली आहे.
रविवारी बांगलादेशविरुद्धच्या साखळी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना उजव्या घोट्याला दुखापत झाल्याने रावलला बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर शेफालीची बदली म्हणून निवड करण्यात आली. एखाद्या खेळाडूला संघात अधिकृतपणे समाविष्ट करण्यापूर्वी त्याच्या बदलीसाठी इव्हेंट टेक्निकल कमिटीची मान्यता आवश्यक असते.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या इव्हेंट टेक्निकल कमिटीमध्ये वसीम खान (अध्यक्ष, आयसीसी जनरल मॅनेजर – क्रिकेट), गौरव सक्सेना (आयसीसी जनरल मॅनेजर – इव्हेंट्स आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स), अबे कुरुविल्ला (बीसीसीआय टूर्नामेंट डायरेक्टर), मेल जोन्स (स्वतंत्र नामांकित) यांचा समावेश आहे.
