उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचे आयोजन

जळगाव:(बबनराव वि.आराख) शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर हे वेगवेगळे उपक्रम सतत राबवणारे महाराष्ट्रातील एकमेव फाउंडेशन आहे. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील उपक्रमांचे वेळोवेळी आयोजन केले जाते. दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते. श्रावण, अध्यात्म, निसर्ग, पर्यावरण अशा विविध विषयावर कविता सादर केल्या जातात. यामध्ये फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कवी, कवयित्री मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि सहभागी सर्वांनाच ऑनलाइन प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते.

या श्रावण महिन्यांमध्ये दिनांक १६ ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी ८ ते ९:३० या वेळामध्ये झूम मीटिंगद्वारे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले असुन, या शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेल नाच्या अध्यक्षा उज्जैनकर फाउंडेशनच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा दिघी, आळंदी, जिल्हा पुणे येथील कवयित्री सौ.रूपाली ताई चिंचोलीकर असून या कवी संमेलनामध्ये फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.
तर दिनांक २३ ऑगस्ट २०२५ शनिवार रोजी मा.सौ.अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली या ई कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोनही शनिवारी आयोजित ई कवी संमेलनाचे सुरेल सूत्रसंचालन उज्जैनकर फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षा जळगाव येथील कवयित्री श्रीमती ज्योतीताई राणे ह्या करणार आहेत.

याप्रसंगी फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. तसेच या कवी संमेलनात फाउंडेशनचे विविध जिल्ह्यातील पदाधिकारी आपल्या कविता सादर करून सहभाग घेतील आणि हे ई कवी संमेलन उज्जैनकर फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव श्री. गणेश कोळी सर नेहमीप्रमाणे झूम मीटिंगच्या माध्यमातून नियंत्रित करणार आहेत असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा या शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.