नाशिक (बबनराव आराख) : नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी तालुका मुक्ताईनगर येथील उपक्रमशील ज्येष्ठ शिक्षक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष
डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहिरे अकॅडमी नाशिकचा शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल क्रांतीसुर्य शिक्षक प्रेरणा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला.
हा पुरस्कार उज्जैनकर फाउंडेशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत रणसूरे सरांनी नाशिक येथील परशुराम सायखेडकर सभागृहात भव्य सोहळ्यात नुकताच स्वीकारला. डॉ. शिवचरण उज्जैनकर हे गेल्या २५ वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य, कृषी व पर्यावरण क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कार्य करीत आहेत. त्यांचे मराठी भाषा प्रचार आणि प्रसारासाठीचे सुद्धा महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेर मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी यशस्वी आयोजन केलेले आहे.
त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथे १३ आणि १४ डिसेंबर २०२५ ला दोन दिवसीय शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे चौथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन सुद्धा त्यांनी आयोजित केलेले आहे. ते नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी ता. मुक्ताईनगर जि. जळगाव येथे गेल्या २७ वर्षापासून अध्यापनाचे पवित्र कार्य करीत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदर्श शिक्षक, उत्कृष्ट संघटक, उत्कृष्ट समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांना गेल्या आठवड्यामध्येच या पुरस्काराच्या संदर्भात पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अहिरे अकॅडमीचे अध्यक्ष प्रा. डॉ.आनंद अहिरे यांचे निवड पत्र प्राप्त झाले होते. परंतु काही कारणांमुळे नाशिकला हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते जाऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या फाउंडेशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ.प्रशांत रणसूरे सर यांनी हा पुरस्कार नुकताच सन्मानाने स्वीकारला.
या पुरस्कारामुळे डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.