मुंबई: नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेच्या पाचव्या टप्प्याला (SCDPM, 5.0) सक्रियपणे आरंभ केला आहे.
आतापर्यंत यात झालेली लक्षणीय प्रगती:
- सार्वजनिक तक्रार निवारण उद्दिष्टांपैकी 87% लक्ष्ये आधीच साध्य झाली आहेत.
- 480 स्वच्छता मोहिमांपैकी 405 स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या आहेत.
- निरुपयोगी सामान भंगार, ई-कचरा आणि अनावश्यक फायली निकाली काढून सुमारे 31,353 चौरस फूट कार्यालयीन जागा मोकळी करण्यात आली आहे.
- या कारवाईमुळे 81,66,756 रुपयांचा महसूल मिळाला आहे.
नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबवली जात आहे. 09.10.2025 रोजी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत, मंत्रीमहोदयांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आणि संघटनांच्या प्रमुखांसोबत एक आढावा बैठक झाली. त्यानंतर 13.10.2025, रोजी मंत्र्यांनी मंत्रालयाच्या परिसरात फेरी मारून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, उपाहारगृहातील स्वच्छतेचा आढावा घेतला आणि ग्रंथालयाची पाहणी केली. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या कृती, वर्तन आणि विचार प्रक्रियेत सुस्पष्टता असावी, असे आवाहन सर्वाँना यावेळी केले.
नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे मंत्रालय प्रत्यक्ष, डिजिटल आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक आणि गोंधळमुक्त कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेऊन, राममोहन नायडू यांनी स्वच्छता ही जीवनपद्धती म्हणून स्वीकारण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
