मुंबई: माहीमच्या काशी विश्वेश्वर मंदिरात कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी असंख्य भाविकांनी साकडे घालून आणि अखंड नामस्मरण करून प्रार्थना केली. असंख्य भाविकांनी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी केलेल्या ओम नमः शिवाय अखंड नामस्मरणाची हाक काशी विश्वेश्वराने ऐकली आणि काशी विश्वेश्वराच्या कृपेने कुलभूषण जाधव यांच्या बाजूने १५ – १ मतांनी निकाल भारताच्या बाजूने लागला. अशा प्रकारे सध्या भाविकांमध्ये परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवटी भारताच्या सत्याचा विजय आणि पाकिस्तानच्या निचतेचा पराजय झाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पाकिस्तानने निरपराध कुलभूषण जाधव यांच्यावर लावलेले सर्व खोटे आरोप फेटाळून लावले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन काशी विश्वेश्वर मंदिर, स्थानिक समाजसेवक श्री. खातू आणि ज्ञानदा प्रबोधन संस्था व राष्ट्राभिमानी समितीने केले होते.
]]>
Related Posts

लायन हार्ट ग्रुपच्या “नवी मुंबईचे लाडके बाप्पा २०२५” म्हणून सन्मानीत
नवी मुंबई : नेहमीच विविध उपक्रम राबवणाऱ्या सांस्कृतिक उत्सव नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित “सन्मान गणरायाच्या भक्तांचा २०२५” ही आगळीवेगळी…