समर्थ प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित कोकण महोत्सव मोठ्या उत्सहात संपन्न

भाईंदर ( प्रतिनिधी ): समर्थ प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष अनिल रानावडे यांच्या संकल्पनेतून २५ नोव्हेंबर ते ४ डिसेम्बर या दरम्यान नवघर शाळा मैदान, नवघर नाका, भाईंदर पूर्व येथे भव्य आगरी- कोळी -मालवणी -कोकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कोकण महोत्सवाचे उदघाटन मनसे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांच्या हस्ते शिवसेना उपजिल्हा प्रमुख धनेश पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.

या महोत्सवात विविध खाद्य संस्कृती, पारंपरिक लोककला, सुस्वर भजन स्पर्धा, मनोरंजन, जाखडी नृत्य, महिलांसाठी होम मिनिस्टर व इतर स्पर्धा, कोळी नृत्य आदी कार्यक्रम आयोजित केले होते. तसेच लहान मुलांसाठी या ठिकाणी विविध आकाश पाळणे, झोपाळे, ट्रेन उपलब्ध असल्यामुळे लहान मुले, मुलांसहीत तरुण तरुणीनी मनसोक्त धमाल केली.

विभागातील नागरिकांना आपल्या धाकाधुकीच्या जीवनातून छोटासा विरंगुळा मिळावा या हेतूने सदर कोकण महोत्सवाचं आयोजन केल्याचं समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आयोजक व मनसे शहर संघटक अनिल रानावडे यांनी मतं व्यक्त केलं.
सदर महोत्सवास शंकर विरकर, मोहन पाटील, बाळा नांदगावकर, नयनभाई कदम, विशाल पाटील आदींनी भेट दिली तर भाईंदर पूर्व विभागातील सर्व जात- धर्मीय लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद लुटला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष दिगंबर नलावडे, संजय जगताप, उपसचिव अनिल आंब्रे, खजिनदार अशोक सकपाळ, उपखजिनदार सुनिल शिंदे, गिरीश सावंत, भरत गायकर, संजय रटाटे, निलेश कोबनाक, डॉ. भरत झिंजुर्गे, सचिन भोईटे, रविंद्र पवार, अर्जुन कदम, सुहास लोंढे, अनिल कोटकर, कोंडीराम रानावडे, विवेक सावंत, अक्षता जाधव, रोशनी गावकर, विनायक काते, अनंत तांबे, सविता अधिकारी यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.