मराठी उद्योजकांनी दरमहा एकत्र यावं, एकमेकांना मदत करावी, आपले व्यवसायामध्ये मदत व्हावी याचबरोबर एकत्र येऊन भविष्यात मोठे प्रकल्प उभे राहावेत, याकरता समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स या प्लॅटफॉर्मचे शिवस्वराज्य लोक चळवळीच्या माध्यमातून निर्मिती झाली आहे. या बिझनेस ग्रुप ची तिसरी शाखा पालघर जिल्ह्यात सुरू केली. मुंबई शहर आणि उत्तर मुंबई या दोन शाखा सुरू आहेत लवकरच कोकणातील सर्व जिल्ह्यात आणि पुणे ठाणे सर्व प्रमुख शहरांमध्ये मराठी उद्योजकांचे संघटन चेंबरच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
समृद्ध मराठी आणि समृद्ध महाराष्ट्र ही चळवळ मराठी माणसांच्या आर्थिक समृद्धीच्या माध्यमातून झाली पाहिजे. धडपडणारे मराठी उद्योगी युवक एकत्र यावेत याकरता छोट्या उद्योजकांसाठी शिवस्वराज्य मराठी उद्योजक समूह आणि मोठ्या उद्योजकांसाठी समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स काम करणार आहे. काल पालघर जिल्ह्यातील प्रमुख २५ उद्योजकांचे उपस्थितीमध्ये याचा आरंभ झाला.
यावेळी चेंबरचे सीईओ राम कोळवनकर, पालघर चे प्रमुख समन्वयक आशिष बर्वे आणि मान्यवर उद्योजक उपस्थित होते. काल या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिलो.
संजय यादवराव
संस्थापक
शिवस्वराज्य मराठी लोक चळवळ
