नवी मुंबई : (विरेंद्र म्हात्रे) भारतीय जनता पार्टी नेरूळ प्रभाग क्रमांक ९६/९७ पुरुस्कृत यंगस्टार मित्र मंडळ आयोजित नानाची मानाची हंडीचे आयोजन करण्यात आले होते. श्री गणेश मैदान सेक्टर-१६ येथे हा उत्सव रंगला. यावेळी वनमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. गणेशजी नाईक साहेबांच्या शुभहस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले, तसेच टी शर्ट चे अनावरण करून गोविंदा पथकास पुरस्कार देण्यात आले. मा. नगरसेविका रुपाली किस्मत भगत, समाजसेवक गणेशदादा भगत, संजयजी पाथरे, सचिन लवटे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.
नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील एकूण ६५ गोविंदा पथकांनी यात सहभाग घेतला. गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी अपोलो हॉस्पिटलची वैद्यकीय टीम उपस्थित होती. दही हंडी उत्सव साजरा करण्यासाठी यंगस्टार मंडळाच्या सर्व सदस्यानी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक सूरज पाटील, माजी नगरसेविका सुजाता पाटिल, समाजसेवक संजय ठाकुर, भरत सकपाल, अक्षय पाटील, रमेश नरवडे, दादा पवार, दिलीप राऊत, सहादु सुकाले, वासुदेव पाटील, राहुल गायकवाड़, शैलेश भोईर, रंगनाथ बारवे, प्रशांत जाधव, वैभव जाधव, शिवाजी पिंगळे, गोरक्षनाथ गांडाळ, तुकाराम जूनघरे, चंद्रकांत महाजन, सदानंद मोरे, सुहास सावंत, शशिकांत गोरड, जयकुमार ढमाले, विनोद चालके, विनोद पोटे, नारखडे सर, राजेंद्र कांबळे, संतोष शिंदे, भाऊसाहेब खुले, सुनील वायकर, महादेव जगताप, संजय गुजर इत्यादी उपस्थित होते.