एकविरा कला क्रीडा मंडळ गोविंदा पथकाची ‘एकविरा आई’ला सलामी !

नवी मुंबई (विरेंद्र म्हात्रे) :
दहीहंडी उत्सव येत्या १६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणार असून, बाळ गोपाळ ‘दहीहंडी’ फोडण्यासाठी थर रचण्याच्या तयारीला लागले आहेत.

नेरुळ मधील ‘एकविरा कला क्रीडा मंडळ गोविंदा पथक’ मधील गोविंदा दरवर्षी ‘दहीहंडी’ फोडण्यासाठी सहभाग घेत थर लावतात. तत्पूर्वी ‘एकविरा कला क्रीडा मंडळ गोविंदा पथक’ आगरी-कोळी लोकांची आराध्य दैवत असलेल्या कार्ला गडावरील ‘एकविरा आई देवी’ला पथकातर्फे पहिली सलामी देते. या १७ वर्षी देखील ‘एकविरा कला क्रीडा मंडळ गोविंदा पथक’ तर्फे ‘एकविरा आई देवी’ला सलामी देण्यात आली, असे देवनाथ म्हात्रे यांनी सांगितले.