दैनिक हिंदूसम्राट कार्यकारी संपादीका कै. पल्लवीताई उत्तम कागले यांचे दुःखद निधन

नवी मुंबई (विरेंद्र म्हात्रे) : दैनिक हिंदूसम्राट कार्यकारी संपादीका कै.पल्लवीताई उत्तम कागले यांचे बुधवार दिनांक ३० जुलै २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

गेली अनेक वर्षे त्या दैनिक हिंदूसम्राटच्या कार्यकारी संपादक म्हणून धुरा सांभाळत होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हिंदूसम्राट मध्ये काम करण्यास सुरू करण्यापूर्वी त्या लोकसेवा महासंघाच्या राज्य अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. तसेच दैनिक हिंदूसम्राटचे संपादक उत्तमराव कागले यांच्या त्या पत्नी होत. त्यांचा मित्रपरिवार फार मोठा आहे. त्यांचे संगणकामध्ये असणारे ज्ञान, वृत्तपत्र चालवण्याचे असणारे कौशल्य याची आज दिवसभर चर्चा होत होती. त्यांच्या निधनाने दैनिक हिंदूसम्राट बरोबरच पत्रकारिता क्षेत्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. रक्षा विसर्जन बुधवार दिनांक ३० जुलै २०२५ रोजी आहे.