रोहा (रायगड): हिंदू महासभा महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक पदी रायगडचे भूमिपुत्र व युवा सह्याद्रीचे संपादक श्री. अरुण आत्माराम माळी यांची नुकतीच सातारा येथील पक्षाच्या द्वीवार्षिक अधिवेशनात बिनविरोध निवड करण्यात आली असून, त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम रोहा तालुका हिंदू महासभेच्या वतीने शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आला. त्याच बरोबर जिल्हा कार्यवाह मधुकर खामकर यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून रोहा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर नाम फलक लावण्याची जाहीर मागणी हिंदू महासभा राज्य संघटक अरुण माळी यांनी केली आहे. तसे लेखी निवेदन देखील रोहा नगरपरिषदेला दोन महिन्याआधीच देण्यात आले आहे. दरम्यान रोहे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी फलक लावले असल्याचे तालुका अध्यक्ष श्री. गणेश पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु प्रत्येक्षात ते फलक जेव्हा पाहण्यात आले तेव्हा ते नाळ्याच्या लगत नागरिकांना दिसणार नाही अशा ठिकाणी लावण्यात आल्याचे व त्या ठिकाणी कचरा आणि दारूच्या बाटल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर पवित्र ठिकाणी साफसफाई करण्यात यावी अशी विनंती हिंदू महासभा तालुका अध्यक्ष गणेश पवार यांनी नगरपरिषदेचे अधिकारी श्रीनिवास पाटील यांना देण्यात आली. परंतु स्वच्छतेचे आश्वासन देऊन देखील तेथे साफसफाई मात्र करण्यात आली नाही. तेव्हा गणेश पवार यांनी स्वतः तेथे जाऊन साफसफाई केली व ते फलक पाण्याचे स्वच्छ केले. सदर आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग नाम फलकास हिंदू महासभा राज्य संघटक तथा रायगड जिल्हा अध्यक्ष अरुण माळी यांच्या हस्ते पुस्पमाळा अर्पण करण्यात आली. यावेळी सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूस २६ फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनापूर्वी दिशादर्शक फलक लावण्यात यावे असे जाहीर आवाहन उपस्थितांसमोर नगरपरिषदेला करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन हिंदू महासभा रोहा तालुक्याचे वतीने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदू महासभेचे तरुण तडफदार अध्यक्ष गणेश पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी रायगड जिल्हा कार्यवाह मधुकर खामकर, पेण तालुका अध्यक्ष नागेश जगताप, राजेंद्र जाधव, वैभव शेडगे, चंद्रकांत नामदार, राजेश नाकती इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवातीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
]]>
Related Posts
उरण नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) भावना घाणेकर यांचा दणदणीत विजय
उरण प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी उरण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी जबरदस्त विजय मिळविला. भावना घाणेकर…
राजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजयी.
राजापूर प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, माजी विधान परिषद आमदार ॲड. हुस्नाबानू खलिफे यांचा…
