राजापूर प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, माजी विधान परिषद आमदार ॲड. हुस्नाबानू खलिफे यांचा मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय झाला.
या विजयानंतर महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, नेते मंडळी यांच्याकडून ॲड. हुस्नाबानू खलिफे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार गणपतराव कदम, काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता कदम, उपजिल्हा प्रमुख रवी डोळस, काँग्रेस जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, तालुका प्रमुख कमलाकर कदम, शहर प्रमुख संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष सातोसे, सोलगावचे मनोहर गुरव, काँग्रेस शहर अध्यक्ष अजीम जैतापकर, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार ॲड. जमीर खलिफे, अफरोज झारी, विनय गुरव, नेहा तानवडे, सुबोध पवार, सौ. जान्हवी वादक, सिद्धांत जाधव, शबाना मुल्ला, सुलतान ठाकूर, अमिना गडकरी हे उमेदवार देखील उपस्थित होते.
या सगळ्या विजयी उमेदवारांचे सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा.
