प्रतिनिधी: सुरक्षा रक्षक आपली नियमित कामगिरी सांभाळत असताना समाजसेवी वृत्ती दाखवून इतरांना देखील मदत करतात. याच बाबींचा विचार करत बैक आफ इंडिया येथे कार्यरत असलेले भालचंद्र कासले आणि नन्दजी दुबे यांना बदलापूर येथे दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी कार्यक्रमात सन्मानित करून प्रमाणपत्र व स्मृति चिन्ह बहाल करण्यात येणार आहे. याबाबत आयोजक सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था युट्यूब चॅनल प्रविण विटेकर, दीपक चाळके, दत्तात्रय पाटील यांनी अशी माहिती दिली.
यावेळी सत्कार समारंभात भालचंद्र कासले, नन्दजी दुबे तसेच राज्यातील इतर सुरक्षा रक्षकांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.
दिनांक २६ में २०२५ रोजी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी अतिवृष्टीमुळे बैक ऑफ इंडिया, सेक्टर ११ या ठिकाणी चार फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे कर्मचारी वर्ग जीव मुठीत घेऊन जात असताना सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक भालचंद्र कासले, नन्दजी दुबे यांनी कर्तव्य बजावताना कर्मचारी वर्गाला नवी मुंबई महानगरपालिकाच्या नाल्यात पडू नये म्हणून सुरक्षित मार्गाने
जाण्यासाठी मार्गदर्शन केले. याबद्दल बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी वर्गाने त्यांचे आभार मानले.
सुरक्षा रक्षकांच्या उत्कृष्ट कर्तृत्वाचा गौरव करणे, आग विझणे, चोरी पकडणे, जीविताचे रक्षण करणाऱ्या रक्षकांचा सन्मान करणे, सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेचे मुख्य कार्य असून यंदा ४थे वर्ष आहे.
