क्रिकेटचा निस्वार्थ सेवक – अमोल मुजुमदार

Amol Mujumdar

मुंबईकर अमोल मुजुमदार यांनी महिला संघाला विश्वचषक जिंकून देत महिला क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात केली.

नवी मुंबई (भास्कर गाणेकर): सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. भारताची विश्वविजेता कर्णधार हरमनप्रीत कौर प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या पाया पडतानाचा. २०१७ साली जेव्हा भारताला इंग्लंडकडून हातातोंडाशी आलेला सामना गमवावा लागला तेव्हा भारतीय क्रिकेट विश्वात बऱ्याच हालचाली झाल्या. प्रशिक्षक बदलले गेले. कर्णधार बदलले. पण यश मात्र पदरी पडत न्हवते. ऑक्टोबर २०२३ ला जेव्हा ही जबाबदारी अमोल मुजुमदार यांच्यावर सोपविण्यात आली तेव्हा त्यांनी कुठल्याच गोष्टीची तडजोड न करता फक्त आणि फक्त क्रिकेटला प्राथमिकता देत खेळाडूंकडून सर्वोत्तम प्रदर्शन काढले. याच स्पर्धेत बघा ना. जेव्हा साखळी फेरीत तीन सामने हरल्यानंतर स्पर्धेतून बाहेर जाण्याची नामुष्की ओढवली असताना अमोल मुजुमदार यांनी स्वतःवर व संघावर विश्वास ठेवत एक अद्भुत कमबॅक करत स्पर्धाही जिंकली.

ऑक्टोबर २०२३ मध्ये अमोल मुझुमदार यांनी भारतीय महिला संघाची सूत्रे हाती घेतली आणि त्यांचे प्राथमिक काम ड्रेसिंग रूममधील वातावरण सुरळीत करणे होते. मागील पाच वर्षे उलथापालथीचा काळ होता – अशांतता, गटबाजी आणि ड्रेसिंग रूममधील गोष्टी इतरत्र पसरणे, अश्या गोष्टीत सर्रास घडत होत्या. अमोल यांनी सर्वप्रथम या गोष्टी थांबवल्या आणि त्याचा संदर्भ हरमनप्रीतने पत्रकार परिषदेत याविषयी भाष्यही केले.

अमोल मुजुमदार यांच्याविषयी थोडक्यात

अमोल मुझुमदार यांनी मुंबईसाठी रणजी ट्रॉफी पदार्पणातच शानदार द्विशतक झळकावले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये २० पेक्षा जास्त हंगामात त्याने ११,१६७ प्रथम श्रेणी धावा केल्या ज्यामध्ये ३० शतके होती. ते कधीही भारताकडून खेळले नाही, कारण त्या काही सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारख्या मात्तबगार खेळाडूंमुळे मधल्या फळीत जागा नव्हती. निवृत्तीनंतर, मुझुमदार यांनी प्रशिक्षकपद स्वीकारले आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मधील विविध वयोगटातील संघांसह त्यांनी उत्तम कामगिरी केली. ते आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या सपोर्ट स्टाफचा भाग होते आणि दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजी सल्लागार म्हणून काम करत होते. परंतु महिला संघाचे प्रशिक्षण देणे त्यांच्यासाठी खूपच कठीण होते. प्रशिक्षक म्हणून ते आता विश्वचषक विजेते आहेत.

मुजुमदार यांनी हा किताब जिंकल्यानंतर टीव्हीवर मुलाखत देत बोलताना त्यांच्या भूमिकेबद्दल जास्त काही सांगितले नाही, उलट खेळाडूंना श्रेय दिले. “अविश्वसनीय कामगिरी! आणि ते (खेळाडू) प्रत्येक श्रेय आणि येथून पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीस पात्र आहेत. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे.” असे ते म्हणाले.

मुझुमदार यांनी शफाली वर्माचे विशेष कौतुक केले, जी मूळ संघात नव्हती आणि जखमी प्रतीका रावलच्या जागी आली होती. शफाली तिच्या अष्टपैलू कामगिरीमुळे अंतिम सामन्याची स्टार होती.