लायन हार्ट ग्रुपच्या “नवी मुंबईचे लाडके बाप्पा २०२५” म्हणून सन्मानीत

नवी मुंबई : नेहमीच विविध उपक्रम राबवणाऱ्या सांस्कृतिक उत्सव नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित “सन्मान गणरायाच्या भक्तांचा २०२५” ही आगळीवेगळी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा यांच्या वतीने नवी मुंबईपूरती मर्यादित होती. यामध्ये पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत “नवी मुंबईचे लाडके बाप्पा २०२५” म्हणून लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई आयोजित लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चा राजाने “नवी मुंबईचे लाडके बाप्पा २०२५” हा पुरस्कार पटकावला.

या स्पर्धेमध्ये शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या सजावटीचा २ मिनिटांचा व्हिडिओ आयोजकांकडे पाठवला होता. प्राप्त व्हिडिओंच्या परीक्षणानंतर १० विजेत्यांची निवड करण्यात आली.

संस्कृती उत्सव नवी मुंबई यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव या स्पर्धेत लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई आयेजित लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचा राजा यांना नवी मुंबईचे लाडके बाप्पा २०२५ हा मान स्पर्धेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी परीक्षकांनी नामांकनातील सर्व फोटो व व्हिडिओंचं काटेकोर मूल्यमापन करून दिला. विजेत्यांची घोषणा ४ सप्टेंबर रोजी सांस्कृतिक उत्सव नवी मुंबईच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर करण्यात आली होती.

स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा नेरूळ सेक्टर १५ येथील दत्त मंदिर येथे रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता पार पडला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.