‘हिंदु मक्कल कत्छी’चे संस्थापक अर्जुन संपथ, त्यांचा मुलगा आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ नेते यांना मारण्याचा कट चेन्नई – ‘हिंदु मक्कल कत्छी’चे संस्थापक अर्जुन संपथ यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांची हत्या करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी कोईम्बतूर येथून ५ आतंकवाद्यांना अटक केली. अटक केलेले हे सर्व आतंकवादी इस्लामिक स्टेटचे समर्थक असल्याचे समोर आले आहे. गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आर्. अशिक, एस्. इस्माइल, एस्. शमसुद्दीन, एस्. सलाऊद्दीन आणि जाफर सादिक अली अशी त्यांनी नावे आहेत. १. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते ‘हिंदु मक्कल कत्छी’चे संस्थापक अर्जुन संपथ आणि त्यांचा मुलगा ओंकार बालाजी यांच्यासह ‘हिंदु मुन्नानी’चे नेते मूकंबीगाई मणी यांची हत्या करणार होते. काही दिवसांपूर्वीच या सर्व नेत्यांना ठार करण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. तेव्हापासून या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. २. हत्या करण्यासाठी ४ जण २ सप्टेंबरला चेन्नईहून कोईम्बतूरला आले होते. याच ठिकाणी रेल्वेस्थानकावर त्यांनी ५ व्या संशयिताची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गुप्तचर आणि पोलीस यांचे लक्ष होते. ३. या ५ तरुणांपैकी एका तरुणाचे दूरभाषवरील संभाषण सतर्क प्रवाशाने ऐकले होते. यात तमिळनाडूतील हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या २ नेत्यांच्या हत्येच्या कटाविषयीची चर्चा त्याने ऐकली. त्या प्रवाशाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने धर्मांध तरुणांना अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची स्वीकृती दिली. ४. अटक केलेल्या तरुणांपैकी इस्माईल हा इस्लामिक स्टेटचा सदस्य आहे. तो सामाजिक माध्यमावर इस्लामिक स्टेटच्या संदर्भातील माहिती पोस्ट करायचा. हे पाचही तरुण सामाजिक माध्यमाद्वारेच एकमेकांच्या संपर्कात आले. स्रोत : सनातन प्रभात]]>
Related Posts
लठ्ठपणावर झटपट उपायांद्वारे उपचार करता येत नाही; चूकीच्या माहितीला आळा घाला, वजन कमी करणाऱ्या औषधांचा विवेकाने वापर करा: डॉ. जितेंद्र सिंह
Obesity cannot be treated with quick fixes; Curb misinformation, use weight loss drugs judiciously: Dr. Jitendra Singh
