लोणावळा, दि. १७ (पीसीबी) – कुमार रिसॉर्ट प्रकरणात अल्पवयीन आयेशावर पाशवी बलात्कार करून तीचा निर्घृण खून करणार्या संतोष कमला रॉय या मुख्य आरोपीचे अधिकृत छायाचित्र लोणावळा शहर पोलिसांकडून प्रसिध्द करण्यात आले आहे. लोणावळ्यात हॉटेल कुमार रिसॉर्ट येथे लग्न समारंभास आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणातील दोन आरोपींपैकी एक आरोपी अजय शंकर दांधडे (वय ४०, रा. आर्वी, जि. वर्धा) यास पोलिसांनी १३ मार्च रोजी अटक केली होती. मात्र यातील मुख्य आरोपी संतोष कमला रॉय (वय ३२, रा. आराजीला, बिहार) हा अद्याप फरार आहे. आरोपी संतोष रॉय याचा या घटनेमधील सहभाग निच्छीत करण्यासाठी आरोपीच्या आईच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची डी.एन.ए. चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी “पॉझिटीव्ह” आली असून संतोष रॉय हाच आरोपी असल्याचे निच्छीत झाले आहे. मात्र तो अद्यापी फरार असल्याने त्याच्या शोधासाठी डोक्यावर केस असलेले तसेच केस नसलेले अशी दोन छायाचित्र पोलिसांनी प्रसिध्द केली आहेत. ही छायाचित्र विविध पोलीस स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून चिटकविण्यात येत आहे. छायाचित्रातील वर्णनाचा आरोपी दिसून आल्यास त्यांनी त्वरीत ०२११४-२७३०३३, २७३०६२ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन लोणावळा पोलिसांनी नागरिकांना केले आहे. वरील आरोपीचे छायाचित्र सर्व नागरीकांन प्रर्यत पोहवीण्यात यावे ही विनंती…]]>
Related Posts
बारामती नगरपरिषद निवडणूक: धक्कादायक प्रकार! तीन मतदारांच्या नावावर भलत्याच व्यक्तींनी केले मतदान
Baramati Municipal Council Election: Shocking incident! Wrong people cast votes in the names of three voters
