मुंबई:- गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माणसाच्या व मराठी अस्मितेच्या नावाने विविध राजकीय पक्षांनी फक्त राजकारण केले, परंतू एक उमदा मराठी तरुण मराठी भाषा रक्षणासाठी आपल्या निवडक सहकाऱ्यांना सोबत घेऊन अहोरात्र झटत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या कठोर परिश्रमाला विविध विभागाच्या सरकारी अधिकाऱ्यांची साथ देखील मिळत आहे. थोडक्यात काय तर, “केल्याने होत आहे रे….” या म्हणीचा येथे प्रत्येय येत आहे. याच यशाचा भाग म्हणून खालील रेल्वे स्थानकांमध्ये मराठीचा झेंडा डौलाने फडकत आहे. MATUNGA ROAD चे माटुंगा रोड…. (स्थानक व्यवस्थापक अखिलेश एफ. साहेब) MAHIM JUNCTION चे माहिम जंक्शन (उप स्थानक व्यवस्थापक – मनीष सुरती साहेब ) KHAR ROAD चे खार रोड (स्थानक व्यवस्थापक – मिलिंद किर्तीकर साहेब, ) SANTACRUZ चे सांताक्रूझ, (स्थानक व्यवस्थापक – राणे साहेब) दिनांक १५/१२/२०१६ रोजी स्थानकात जाऊन त्रिभाषा सूत्रा नुसार स्थानकाचे नाव मराठी मध्ये ठळक अक्षरात व योग्य पद्धतीने असावे या संदर्भात स्थानक व्यवस्थापकांना मराठी बोला चळवळीच्या माध्यमातून निवेदन दिले. मराठी बोला चळवळ स्वप्निल संभाजी बाम्हणे मनोज वसंत शेलार]]>
Related Posts
सत्ताधाऱ्यांचा विजय की ईव्हीएमचा चमत्कार?
निकालांवर संशयाची सावली; लोकशाही धोक्यात असल्याचा जनतेचा आरोप मुंबई प्रतिनिधी: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच लोकशाहीचा विजय…
