लंडन: बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटने निकाल लागलेल्या सामन्यात रौप्य पदकाची कमाई केली. चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सुवर्णपदकासाठी झालेल्या या सामन्यात दोन्ही हाफमध्ये एकही गोल झाला नाही. अखेर पेनल्टी शूटआऊटद्वारे सामन्याचा निकाल लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने हा सामना १-३ असा गमावला. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने कांगारुंना एकही गोल करु दिली नाही. १९७८ सालापासून झालेल्या या स्पर्धेत भारताने या आधी १९८२ साली नेदरलँडमध्ये झालेल्या स्पर्धेत कास्य पदक फटकावले होते. त्यानंतर भारताने आपली आज सर्वोत्तम कामगिरी करीत कास्य पदकाला गवसणी घातली.]]>
Related Posts

अखेर श्रीगणेश… मुंबई इंडियन्सचे खाते उघडले
आयपीएल २०२५ मध्ये घराच्या मैदानावर आपला पहिला सामना खेळताना मुंबई इंडियन्सने आपला फेव्हरेट प्रतिस्पर्धी कोलकाता नाईट रायडर्सचा एकहाती पराभव करीत…