मालेगाव:- मालेगाव कारखान्यावर ऊसतोडणी व वाहतुक करण्यासाठी आलेल्या बैलगाडीला धुमाळवाडी हद्दीतील भिकोबानगरच्या परीसरातील निरा डाव्या कालव्याच्या वितरिका क्र.१८ मध्ये बुडून दोन बैलांचा करुन अंत झाला आहे. यावेळी उपस्थित महिला मजुरांनी एकच आक्रोश केला. तिव्र उतारामुळे वाहतुक करण्यासाठी कसरत करावी लागत होती. कारखाना प्रशासनाकडे वारंवार पर्यायी रस्त्याची मागणी करूनही केले दुर्लक्ष करण्यात येत आहे. २ लाखांच्या नुकसानापेक्षा जीवापाड जपलेल्या दोन जीवांना स्वतःच्या डोळ्यांनी पाण्यात गुदमरून मरताना पहान्याची वेळ दुर्दवी गाडीमालकावर आली. निश्चीतच आज बिचाऱ्या कुटुंबात आज चुल पेटनार नाही. [gallery columns="4" link="file" ids="757,758,759"]]]>
Related Posts

नवसाला पावणारी भगूरची रेणुका माता
भगूरचे श्री रेणुका माता मंदिर एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे, ज्याची स्थापना भृगु ऋषींनी केली असल्याचे मानले जाते. या…