स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ६० व्या आत्मार्णण दिनानिमित्त सावरकर भक्तांचा मेळावा संपन्न

मुंबई:- हिंदू सभा मुंबई, हिंदू महासभा परळ शाखा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त सावरकर भक्तांचा मेळावा २६ फेब्रुवारीला मुंबईत दादर येथील पाटील मारुती मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला. प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध विषयांवर मार्गदर्शन, तात्विक विवेचन आणि विचार अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहेत. या वर्षी “रोहिंगे मुसलमान आणि बांगलादेशी घुसखोर मतदार व राष्ट्रीय समस्या” या विषयावर ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री. आनंद कुलकर्णी, हिंदू महासभा प्रदेश प्रवक्ता यांनी विचार व्यक्त करताना म्हणाले की, आपल्या देशात चाळीस हजार रोहिंगे आहेत. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेवर, समाजव्यवस्थेवर, ताण पडतो. घुसखोर मुसलमान केवळ निर्वासित म्हणून येतात आणि बहूसंख्य होताच भूमी बळकावण्यापर्यंत त्यांची मजल जाते. ज्या रोहिंगे मुसलमानांना सौदी, इंडोनेशिया सारख्या मुस्लिम देशांनी आश्रय दिला नाही, ते हिंदूस्थानात मुक्तपणे रहात आहेत. तीच स्थिती बांगलादेशी घुसखोरांची आहे. त्यांनीही आपला रोजगार घेतला आहे. त्यांच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक असताना आपण परप्रांतीय अन्य भाषिकांच्या विरोधात बोलणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. दिनेश भोगले म्हणाले की, ज्या बांगलादेशी घुसखोरांच्या मतांसाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी काळा कोट चढवला आहे, त्यांना केवळ बंगालमध्ये सत्ता हवी आहे. बांगलादेशी घुसखोर राहिले नसून ते दहशतवादी बनले आहेत. दिल्लीतील ध
बॉम्बस्फोटाच्या शोध कामात बांगलादेशी घुसखोर पकडले गेले आहेत. राज्यात आणि केंद्रात तथाकथित हिंदुत्ववादी डबल इंजिन सरकार असताना, बांगलादेशी घुसखोर फेरीवाल्याना पालिकेचा महापौर हटवत आहेत. बांगलादेशी घुसखोरांना सरकारने हटवले नाही, तर बांगलादेशी घुसखोरांना हटविण्यासाठी हिंदू महासभा सरकारवर हिंदू जनमताचा दबाव आणेल.

या प्रसंगी मुंबई हिंदू महासभा अध्यक्ष श्री. अनुप केली, प्रदेश कार्यवाह श्री. महेश सावंत पटेल यांनी विचार व्यक्त केले. श्री. हरिश शेलार यांनी प्रास्ताविक केले तर सुत्र संचालन श्री. दिलीप मेहेंदळे यांनी केले. तसेच कार्यक्रमाची सुरुवात हिंदू महासभा कार्यकर्ते अरुण माळी यांनी सावरकर रचित हिंदु ध्वज गीताने केली आणि कार्यक्रमाची सांगता देखील त्यांनी संपूर्ण वंदेमातरम गीताने केली. या प्रसंगी सावरकर प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

हिंदू महासभा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावरकर भक्तांचा मेळाव्यात दीप प्रज्वलन करताना श्री. आनंद कुलकर्णी त्यांच्या शेजारी डावीकडून सर्वश्री. सभेचे अध्यक्ष दिनेश भोगले, मुंबई हिंदू सभा अध्यक्ष अनुप केणी, आणि प्रदेश हिंदू महासभा अध्यक्ष अधिवक्ता श्री. दत्ताजी सणस दिसत आहेत.