यादव, फलंदाजांच्या भरीव कामगिरीच्या जोरावर भारताने मालिका घातली २-० ने खिशात केवळ औपचारिकता म्हणून हि कसोटी मालिका आयोजित केली असे म्हटले तरी वावगळ ठरणार नाही. १९९४ नंतर ज्या क्षणाची वेस्ट इंडिज आतुरतेने वाट पाहत होते त्यावर आजही विरजण पडले आणि आणखी एक कसोटी तिसऱ्याच दिवसात आटोपली. २०१३ सालाची याच प्रतिस्पर्ध्यांबरोबर झालेली कसोटी मालिका जी सचिन तेंडुलकरची शेवटची मालिका होती, अश्याच तरीने काहीशी झाली होती. दोन्ही सामने तिसऱ्याच दिवशी आटोपले होते. आजही तेच घडलं आणि भारताने दुबळ्या वेस्ट इंडीजवर दहा गडी राखून विजय मिळवत मालिका २-० अशी जिंकली. शार्दूल ठाकूर आपल्या पदार्पणाच्या सामान्यताच केवळ १० चेंडू टाकून जखमी झाला आणि वेगवान गोलंदाजीची जबाबदारी येऊन ठेपली ती उमेश यादववर. भारतासाठी कसोटीत भरवशाचा गोलंदाज म्हणून ज्याकडे मागील २-३ वर्षांपासून पाहिलं जातं त्या उमेश यादवने वेगवान गोलंदाजीची धुरा अगदी चोखपणे सांभाळली. पहिल्या डावात ८८ धावांवर सहा गडी टिपल्यानंतर दुसऱ्या डावातही पाहुण्यांना ससळो कि पळो करून सोडले. दोन्ही डावांत हॅट-ट्रिकची संधी होती परंतु ती काही काबीज करता आली नाही. असो. पहिल्या डावातील माऱ्यानंतर दुसऱ्या डावही त्याने ४५ धावा खर्च करीत वेस्ट इंडिजच्या ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. सामन्यात एकूण १० गडी बाद करण्याचा पराक्रम त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतच नव्हे तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही पहिल्यांदाच केला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारत मजबूत स्थितीत दिसत असताना वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने आपली जादू दाखवत भारताला ४ बाद ३०८ अश्या धावसंख्येवरुन ३६७ धावांवर बाद केले. भारताने तिसऱ्या दिवसाच्या सकाळी ५९ धावांत ६ गडी गमावले. ५६ धावांची नाममात्र आघाडी घेतलेल्या आघाडीनंतर भारताला वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात कडवी झुंज भेटेल असे वाटले होते पण नियतीने काही वेगळेच ठरवले होते. दुसऱ्या सत्रात चहापानापर्यंत वेस्ट इंडिजची अवस्था सहा बाद ७६ अशी दयनीय झाली होती. भारताच्या सर्वच प्रमुख गोलंदाजांनी अगदी अचूक टप्पा टाकत वेस्ट इंडिजच्या आघाडीच्या व मधल्या फळीचे कंबरडेच मोडले. पहिल्या सत्रातील कठीण परिश्रमानंतर शेवटच्या सत्रात वेस्ट इंडिजची मदार आली ती पुन्हा एकदा जेसन होल्डरवर. भारताच्या पहिला डावात पाच गडी बाद केलेल्या होल्डरने वेस्ट इंडीजसाठी सलग तीन डावांत पाच गडी बाद करण्याची किमया केली खरी परंतु त्याच्या या मेहनतीला फलंदाजीत साथ मिळू न शकल्याने भारतीय गोलंदाजीपुढे सर्वच्या सर्व संघ हतबल झाला. पहिल्या डावातील शतकवीर रोस्टन चेसही जास्त काळ तग धरू शकला नाही. सातव्या गड्यासाठी होल्डरने सुनील अम्बरीससोबत केलेली ३८ धावांची भागीदारी व नवव्या गड्यासाठी बिशू व वारिकन यांच्यात झालेली १७ धावांची भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिज कसाबसा १२७ धावांपर्यंत मजल मारू शकला. पुन्हा एकदा संघ ५० शतकेही खेळण्यास असफल ठरला. जिंकण्यासाठी ठेवलेले ७२ धावांचं लक्ष्य भारताने कोणतीही घाई न करता आरामात पार केलं. या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्या पृथ्वी शॉने राहुलच्या साथीने काहीशी समजदार दाखवीत भारताला १७ व्या षटकात विजयश्री केलं. पहिल्या कसोटीतील अपयश व या कसोटीतील आगाऊपणा राहुलने मागे टाकत शांत दिमागने ५३ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या तर शॉने चेंडू खेळत तितक्याच धावा केल्या. भारताने मालिका खिशात घालताच एका नव्या विक्रमही गवसणी घातली. सलग १० कसोटी मालिका घराच्या मैदानावर जिंकताच ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी केली. यादवच्या सर्वोत्तम कामगिरीला सामानावीराचा तर युवा पृथ्वी शॉच्या धडाकेबाज फलंदाजीला मालिकावीराचा किताब देण्यात आला.]]>