ग्रुप ग्रामपंचायत भालगाव सार्वत्रिक निवडणूक २०१८ रोहा: तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी ग्रुप ग्रामपंचायत भालगावची सार्वत्रीक निवडणूक येत्या बुधवारी (२६ सप्टेंबर) रोजी पार पडत आहे. शिवसेना-राष्ट्रवादी युती झाल्याने मागील निवडणुकीत वर्चस्व असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शेकापची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ऐन निवडणुकीच्या वेळेस सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केल्यामुळे शेकापला या निवडणुकीत हक्काच्या मतांना मुकावं लागणार आहे. तरीही शेकाप आपल्या सर्व ताकतीनिशी रणांगणात उतरली असून या निवडणुकीत हमखास यश प्राप्त करेल असा विश्वास प्रभाग क्रमांक २ चे शेकापचे उमेदवार उमेश धामणे यांनी व्यक्त केला आहे. आमच्या प्रतिनिधीनींशी बोलताना तो म्हणाले, “शेतकरी कामगार पक्षाने ग्रामपंचायतीच्या हद्दीत बरीच विकासकामे केली आहेत. प्रत्येक गावात मूलभूत कामांचा पाठपुरावा करून संबंधित लोकप्रतिनिधीनींकडून करावूनही घेतली आहेत. शिवाय आज जनतेला चांगलं काय व चुकीचं काय याची जाण असल्यामुळे जनता विकासकामांनाच साथ देईल याचा मला आत्मविश्वास आहे.” मागील निवडणुकीत शिवसेना-शेकाप यांच्या युतीने राष्ट्रवादीची एकहाती आलेली सत्ता मोडीत काढीत तालुक्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले होते. परंतु या निवडणुकीच्या वेळेस अपेक्षित युती न झाल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांनी युती करीत शेकापला मोठे आव्हान दिले आहे. शेकापने घरोघरी जात आपल्या विकासकामांचा पाढा जनतेसमोर मांडला आहे. उमेश धामणे यांनी स्वतः गावोगावी जात तसेच आपल्या मुंबईच्या उमेद्वारांनाही स्वतः भेट देऊन निवडणुकीस आपल्याला साथ देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या निवडणुकीत त्यांचे बंधू व शेकापचे तालुका सरचिटणीस विनायक धामणे यांनीही मोलाचे सहकार्य केले आहे.]]>