संभाजीनगर :- काल संभाजीनगरमध्ये हिंदु एकतेचे प्रदर्शन पहावयास मिळाले. हिंदुंना डिवचल्यावर हिंदु कसा आक्रमक व एकवटला जातो याचे जीवंत उदाहरण म्हणजे कालची संभाजीनगर मधील ” महाआरती” होय. काल संध्याकाळी संभाजीनगर मध्ये सर्व हिंदुंनी एकत्र येऊन महाआरतीचे केलेले आयोजन आणि या महाआरतीला २ ते ३ हजार हिंदुंनी दर्शविलेली उपस्थिती म्हणजे ही महाआरती अखंड महाराष्ट्रातील सर्वात मोठी महाआरती ठरली आहे… याच दिवशी आयोद्या येथील बाबरी मशीद कारसेवकांनी पाडून तेथे प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर व्हावे म्हणून आंदोलन करण्यास आले होते. त्या वेळेपासून भारतभर ६ डिसेंबर हा “शौर्यदिन” म्हणून साजरा केला जातो. याच धर्तीवर संभाजीनगरमध्ये खडकेश्वर महादेव मंदिर, नारळीबाग संभाजीनगर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले…… (शेखरराव जाधव, संभाजीनगर युवा सह्याद्री प्रतिनिधी)]]>