याबाबत तळा तालुक्यातील मांदाड गावचे ग्रामस्थ नामदेव दामा कांबळे यांनी त्यांना आणि भावाच्या कुटूंबाला वाळीत टाकल्याचे केलेले आराेप तथ्यहीन व बिनबुडाचे खाेटे असून आगरी समाज मांदाडला बदनाम करण्याचा हा एक कट आहे, असे आगरी समाज मांदाडचे नथुराम गाणेकर, विठ्ठल कांबळे, रघुनाथ गाणेकर, नामदेव गाणेकर, प्रविण गाणेकर, गजानन कांबळे, गजानन गाणेकर, अनिल कांबळे, किरण गाणेकर, शुभांगी कांबळे, दामा केरू कांबळे, भरत गाणेकर, रमेश गाणेकर, हरीचंद्र गाणेकर, विकास कांबळे आणि महिला अध्यक्ष निमा नामदेव गाणेकर यांनी आगरी समाज मांदाड व ग्रामपंचायतीवर काहीही कारण नसताना खाेटे आराेप करून बदनाम करत असल्याचे सांगितले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, विठ्ठल जानू कांबळे यांच्या कुटूंबाच्या मालकीच्या जमिनीमध्ये आगरी समाजाने आगरी समाजमंदिर बांधलेले असून, त्यास नामदेव कांबळे व यशवंत कांबळे या दाेघा भावांनी समाजमंदिर बांधताना सहमतीचे हमीपत्र ग्रामपंचायतीमध्ये दाखल केले. तसेच तेथे बांधकाम चालू असेपर्यत या दाेघांनी आगरी समाजासाेबत कामेही केली त्यासाठी लागणारी वर्गणीही भरली हाेती. त्याचबराेबर ज्या ज्या वेळेस मांदाड गावात मांदाड ग्रामस्थ व आगरी समाज एकत्र येऊन सभा तसेच कामासाठी माेडे हाेत असतात, त्या त्या सभेला व माेड्यांना हे दाेन्ही भाऊ उपस्थित देखील असायचे. अशा वेळी या दाेघा भावांना वाळीत टाकण्याचा काहीही संबंध येत नाही. तसेच यांना काेणीही वाळीत टाकलेले नाही. आगरी समाजाच्या प्रत्येक मिटींगचे निमंत्रण देखील त्यांना दिले जाते. त्याचबराेबर गावामध्ये दुकानात जाण्यापासून ते पाणी देण्यापर्यंत काेणीही मनाई केली नाही अथवा काेणतीही आडवणूक केली जात नाही. त्यामुळे आगरी समाजाने त्यांना वाळीत टाकले नाही मात्र समाजाला कुठेतरी बदनाम करण्याचा मानसिक त्रास देण्याच्या हेतूने आराेप करण्यात येत असल्याबाबत आगरी समाज अध्यक्ष व आगरी समाज मांदाड यांनी म्हटले आहे.
या गंभीर प्रकरणी अधिक खोलात गेल्यावर असे निदर्शनास आले की, नामदेव दामा कांबळे यांनी केलेले वाळीत प्रकरणातील आरोप हे धातांत खोटे असून, तक्रारदार यांस ग्रामपंचायतीने त्यांच्या घरी पाण्याचे होम कनेक्शन न दिल्याने हे सर्व बिनबुडाचे आरोप करण्यात आलेले निदर्शनास आले आहे. हे सर्व आरोप खोटे असून स्थानिक पोलिसांनी याबाबत खोलात जाऊन सखोल चौकशी करून, खोटे व बिनबुडाचे आरोप करून आगरी समाजाला बदनाम करणाऱ्या या तक्रारदारांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
]]>