बार्शी:- गेल्या ३ वर्षापासून स्व. सुशिल शितल राऊत यांच्या स्मरणार्थ स्व.सुशिल शितल राऊत मित्र परिवार आणि जय शिवराय प्रतिष्ठाण बार्शी यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले जात आहे. यामध्ये २०१३ साली २३७, २०१४ साली १७० आणि २०१५ साली १७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या झालेल्या रक्तदान शिबीर कोट्यातून ५८२ बाटली रक्त संकलन करण्यात आले. हे सांगण्याचे खरे उद्दिष्ट एकच आहे कि, संकलन करण्यात आलेल्या कोट्यातून मोफत राखीव कोठा असतो. त्यामधून आत्तापर्यंत अतिशय गोरगरिब, गरजू रुग्णांना मोफत सवलती मध्ये रक्त पुरवठा करण्यात आला आहे. आज जगात पैसा खर्च करून सगळ्या गोष्टी मिळतात, पण रक्त मिळत नाही. आज आपण रक्तदान केले तर ते रक्त परत आपले शरीर 3 महिन्यात भरून काढते. आपल्या एका रक्तदानामुळे एखाद्या गरीबाचा जीव वाचू शकतो. म्हणून आपल्या हातामध्ये असलेले सर्वश्रेष्ठ ‘दान’ म्हणजेच रक्तदान करुन आपण एक अनमोल जीव वाचवावा. चला रक्तदान करूया. एक श्रेष्ठदान करूया. तारीख:- ०१/०१/२०१६ वेळ:-सकाळी ८ ते सायंकाळी ६ वार:-शुक्रवार स्थळ:- रामभाई शहा रक्तपेढी, छत्रपती शिवाजी महाराज रोड, बार्शी. आयोजक : स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार, जय शिवराय प्रतिष्ठाण, बार्शी (मनोज वसंत शेलार:- युवा सह्याद्री, प्रतिनिधी)]]>