जळगाव (सागर कुलकर्णी): पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील थकबाकीदार लाभार्थ्यांकडून जुन्या चलनातील ५०० रुपये व १ हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात पाणीपट्टीची थकीत रक्कम स्विकारण्यात येत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी ही रक्कम भरणे सोईचे व्हावे म्हणून सुटीच्या दिवशी शनिवार दि.१२, रविवार दि. १३ व सोमवार दि.१४ (गुरुनानक जयंती) या दिवशीही पाटबंधारे विभागाची कार्यालये सुरु ठेवण्यात आली आहेत. तरी बागायतदार शेतकऱ्यांनी त्यांचेकडील थकीत पाणीपट्टी शाखा कार्यालयात जाऊन जमा करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे.]]>