नेरूळ: सेक्टर २ येथील महापालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला कचऱ्याचा ढिगारा तात्काळ हटविण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे बेलापूर युवा अध्यक्ष श्री. विरेंद्र ( गुरू ) म्हात्रे यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
उद्यानात सुकलेला पालापाचोळ्याचा ढिगारा सफाई कामगारांकडून उद्यानाच्या
प्रवेशद्वारासमोरच ठेवण्यात आला आहे. यामुळे परिसराला व उद्यानाला बकालपणा प्राप्त झाला असून, हा कचरा वेळोवेळी पालिका प्रशासनाने उचलून नेल्यास त्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचणार नाहीत. स्वच्छ व सुंदर नवी मुंबईच्या संकल्पनेला महापालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे गालबोट लागत असून नागरिकांना उद्यानात ये-जा करताना त्रास होत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता हा कचरा शक्य तितक्या लवकर हटविण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे युवा अध्यक्ष – बेलापुर विधान सभा श्री. विरेंद्र ( गुरू ) म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.