ठाणे:- गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत अनेक लोकांना १० हजार रुपायांमध्ये होंडा ऍक्टिवा दुचाकी, २० हजार रुपायांमध्ये १० ग्रॅम सोन्याचे कॉइन, २५ हजारात आयफोन, ८० हजार रुपयांमध्ये बुलेट मोटारसायकल, २ लाखामध्ये इनोवा कार, ५ लाख रुपयामध्ये नवीन घर देतो असे अमिश दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम घेऊन त्यांना कोणतीही वस्तू न देता व पैसेही न देता पळून गेल्याबाबत पोलीस ठाणे गु.र.क्र. २१/१६, २२/१६, २३/१६, २४/१६ आणि ३२/१६ कलम ४२० भा.द.वि अन्वये नुततेच एका महाठगा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील अटक आरोपितास दिनांक २०/१/२०१६ रोजी अटक करण्यात आले असून, त्याच्याकडून ८३,२५०००/- किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या संदर्भात आज दिनांक ०३/०२/२०१६ रोजी सकाळी ११:३० वाजता गांवदेवी पोलीस ठाणे येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.. (श्री. सतिषराव गुरव:- युवा सह्याद्री)]]>