लय भारीच्या भन्नाट यशानंतर रितेश देशमुख आपल्या मुख्य भूमिकेतील दुसऱ्या मराठी चित्रपटात शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला तो ‘माऊली’. आदित्य सरपोतदारांचं दिग्दर्शन व रितेशची पत्नी जेनेलिया हिचं स्पेशल गाणं प्रेक्षकांना भुरळ घालणारं आहे. जोडीलाच सैयामी खेर हिचं मराठीतील पदार्पण व ‘सेक्रेड गेम’ च्या माध्यमातून मराठीसह संपूर्ण भारतभरातील जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या जितेंद्र जोशींचं खलनायक रूप. पाहूया या सिनेमाचा हा रिव्ह्यू.
भन्नाट संकल्पना
माऊली सर्जेराव देशमुख यानावाने पोलीस इन्स्पेक्टरची रितेश देशमुखने साकारलेली दुहेरी (डबल रोल) भूमिका प्रेक्षकांनातर खूपच पसंद आली. एक हळव्या मनाचा तर दुसरा मारामारी करणारा माऊली रितेश देशमुखनेअगदी चांगल्या रीतीने साकारला आहे. आदित्य सरपोतदार यांचे दिग्दर्शन आणि कलाकारांनीआपापल्या भूमिकेला दिलेला न्याय चित्रपट पाहिल्यानंतर दिसून येतो. रितेश सोबतच सिद्धार्थ जाधवने साकारलेली बहुरुपियाची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली.
सैयामी खेरचं मराठीतील पदार्पण
तेलगू, हिंदी चित्रपटानंतरसैयामी खेर रेणुकाची भूमिकेतून प्रथमच मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. राज्यपातळीवर गोलंदाज म्हणून भूमिका निभावल्यानंतर सिनेमा क्षेत्रात वळल्यानंतर सैयामीनेवेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. पण मराठीत ती प्रथमच रितेश देशमुखच्या जोडीला मुख्यअभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर उतरली आहे. मसालेवाली रेणुकाने रितेशच्या जोडीलाआपली भूमिका चांगल्या प्रकारे निभावली आहे. अभिनेत्री उषा किरण यांची नात असलेली सैयामीलासुरुवातीला क्रिकेटर व्हायचं होतं. पण तिने सिने क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. सैयामीच्याआई उत्कर्षा म्हात्रे १९८२ सालच्या मिस इंडिया आहेत. घरातूनच अभिनयाचा वारसा लाभलेल्या सैयामीने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे असे म्हणता येईल.
खलनायक जितेंद्र जोशीची अफलातून भूमिका
‘हद्दीत राहायचं! दहशतीचं दुसर नाव, धर्मराज उर्फ नाना लोंढे’ जितेंद्र जोशीने साकारलेली हि खलनायकाची भूमिकातर प्रशंसनीय आहे. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यात माहीर असलेल्या जितेंद्र जोशीने नाना लोंढेची भूमिका खूपच छान निभावली आहे. कापूरगावातील विठ्ठलाच्या मंदिराच्या समोरचबियर बारचं दुकान मांडून संपूर्ण गावावर राज्य करणाऱ्या नाना लोंढेला माऊलीने वठणीवरआणला. हे संघर्ष करीत असताना त्याने आपल्या भावालाही गमावलं.
एकूणच, कथा, भूमिका, ऍक्शन यांनी परिपूर्ण असलेला हा सिनेमा नक्कीच पैसा वसूल आहे.
]]>