कॉजवेचे काम पूर्ण करण्याचीही दिली ग्वाही राजापूर: तालुक्यातील नाटे-तिवरे मोगरे राजवाडी मार्गावरिल कांगापूर येथे कोसळलेल्या कॉजवेच्या दुरूस्तीसाठी स्थानिक खासदार आणि आमदारांकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने रविवारी या परिसरातील ग्रामस्थ व शिवसैनिकांनी माझी भेट घेतली. याप्रसंगी ग्रामस्थ व शिवसैनिकांनी या निकृष्ठ कामाची चौकशी करण्याची व आंम्हाला तात्काळ कॉजवेचे काम व्हावे यासाठी निधी मिळावा अशी मागणी आपल्याकडे केली. या कॉजवेची पहाणी करून या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल असे आश्वासन देतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. नारायण राणे यांच्या निधीतुन कॉजवेसाठी निधी देऊन काम पुर्ण करण्याची ग्वाही दिली. तालुक्यातील नाटे-तिवरे मोगरे राजवाडी या मुख्य मार्गावर कांगापूर गावात कॉजवे आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हा रस्ता झाला आहे. मात्र पहिल्याच पावसात या रस्त्यावरिल हा कॉजवे वाहून गेला आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्याचे आणि या कॉजवेचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाल्यानेच हा कॉजवे कोसळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा कॉजवे कोसळल्यानंतर ग्रामस्थांनी शिवसेनेचे स्थानिक आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला व या कॉजवेच्या दुरूस्तीसाठी निधी द्यावा व हा कॉजवे दुरूस्त करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली. मात्र या मागणीकडे संबधीतांनी आजपर्यंत लक्ष दिलेले नाही. रविवारी नाटे व साखरीनाटे परिसरात दौऱ्यावर आले होतो. ते याच मार्गाने राजवाडीकडे येणार असल्याची माहिती राजवाडी, कांगापूर व परिसरातील ग्रामस्थांना मिळाली होती. त्यामुळे दुपारी १ वाजता भर उन्हात या परिसरातील ग्रामस्थ, शिवसेनेचे गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे कांगापूर येथे कॉजवेजवळ येऊन रस्त्यावरच थांबले होते. या ठिकाणी ग्रामस्थ आपली वाट पहात असल्याचे कळताच तात्काळ तेथे थांबून व गाडीतुन उतरून थेट ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी आपली कैफियत मांडली. अत्यंत निकृष्ठ दर्जाचे हे काम झाले असून पहिल्याच पावसात हा कॉजवे कोसळला असून वाहतुकीची गैरसोय झाली असल्याचे सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही ते याकडे लक्ष देत नाहीत असेही सांगितले. आता तुंम्हीच या प्रश्नी न्याय द्या. या कामाची चौकशी कराच पण या कॉजवेसाठी निधी द्या आणि आमची गैरसोय दूर करा अशी मागणी या ग्रामस्थ व शिवसैनिकांनी केली. हे काम आपणच मार्गी लावू शकता याची आंम्हाला खात्री असून यापुढे आंम्ही सर्व ग्रामस्थ अखंड गाव आपल्या पाठीशी राहू अशी ग्वाही ग्रामस्थांनी यावेळी दिली. यावर तात्काळ दखल घेत या कामाची आपण चौकशी करू आणि दोषी असणाऱ्या अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडू अशी ग्वाही आपण ग्रामस्थांना दिली. तर या कॉजवेसाठी खासदार नारायण राणे यांच्या खासदार निधीतुन तात्काळ आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही ग्रामस्थांना दिली. याबाबत तात्काळ संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना दुरध्वनीवरून संपर्क साधून कार्यवाहिचे निर्देशही दिले. राणे यांनी दिलेल्या या ठोस आश्वासनामुळे व तात्काळ कार्यवाही सुरू केल्याने ग्रामस्थ व शिवसैनिकांनी यापुढे आंम्ही तुमच्या पाठीशी राहू अशी ग्वाही आपल्याला दिली.]]>