हिंदू विरोधी कार्यक्रमावर बंदी घालण्याची समस्त हिंदू संघटनांची मागणी
बळीराजा महोत्सव समितीच्या माध्यमातून होणारा वामन मस्तकभेद, तसेच बळीराजा पुरस्कार वितरण
कार्यक्रमास प्रतिबंध करा …! समस्त हिंदू संघटनांचे उपविभागीय पोलीस अधिकार्यांना निवेदन
कोल्हापूर – बळीराजा महोत्सव समितीच्या माध्यमातून गेली काही वर्षे वामन मस्तकभेद आणि बळीराजा पुरस्कार वितरण असे कार्यक्रम केले जात आहेत. भगवान विष्णूच्या दशअवतारांपैकी वामन हा एक अवतार आहे. या कार्यक्रमामुळे हिंदु धर्म, देवता, धर्मग्रंथ यांचा अवमान करून हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या जातील, अशा प्रकारची वक्तव्य केली जातात. यंदाही हा कार्यक्रम होणार असल्याचे वृत्त काही प्रसिद्धीमाध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. तरी या कार्यक्रमास प्रतिबंध करावा, अशा मागणीचे निवेदन समस्त हिंदू संघटनांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर यांना ६ नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा पुरस्कार जहाल अशा तथाकथित पुरोगामी यांना दिला जातो. त्यात नक्षलवाद्यांचा सहभाग असू शकतो. त्यामुळे वामन मस्तकभेद आणि बळीराजा पुरस्कार वितरण सोहळा या दोन्ही धर्मविरोधी आणि देवतांचे विडंबन करणार्या कार्यक्रमांना प्रतिबंध करावा. त्यातूनही हा कार्यक्रम झाल्यास आयोजकांवर भारतीय दंड विधान कलम २९५ अ, १५३ अ, तसेच अन्य योग्य कलमांद्वारे कठोर कारवाई करावी.
या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे सर्वश्री मनोहर सोरप, नंदकुमार घोरपडे, जयवंत निर्मळे, हिंदु महासभेच्या महिला आघाडीच्या रेखा दुधाणे, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. संभाजी साळुंखे आणि शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, पतित पावन संघटनेचे जिल्हाधक्ष श्री. सुनील पाटील, श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीचे श्री. प्रमोद सावंत, धर्मप्रेमी श्री. अशोकराव पाटील, श्री. गुंडाप्पा काशीद, श्री. अमर आंबेकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, प्रथमेश गावडे उपस्थित होते.
]]>